संत तुकाराम महाराज पालखीचं आज सोलापूर जिल्ह्यात आगमन

संत तुकाराम महाराज पालखीचं आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं. जिल्हा प्रवेशानंतर माळशिरस तालुक्यात अकलूज इथल्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण झाले. त्यानंतर अश्व रिंगण झालं. यावेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर पोलिसांच्या बँड पथकानेही पालखीचं स्वागत केलं.

 

तसेच यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्वाचं आणि पादुकांचं पूजन जिल्हाधिकारांच्या हस्ते करण्यात आलं. विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातले वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीनं चालत आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.