आषाढी एकादशी आता दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. विठुरायाच्या ओढीनं पंढरीकडे निघालेल्या संतांच्या पालख्या आता पंढरपूरपासून अवघ्या काही अंतरावर येऊन पोहोचल्या आहेत. हरिनामाचा जयघोष करत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पंढपूर तालुक्यात आगमन झालं. त्यापूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं ठाकूर बुवा समाधी इथं नेत्रदीपक गोल रिंगण झालं. माळशिरस तालुक्याच्या हद्दीत संत सोपान महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांची बंधुभेट झाली. या सोहळ्यानंतर माऊलींची पालखी भंडीशेगाव इथं मुक्कमी पोहचली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी काल पिराची कुरोली इथं मुक्कमी पोहोचली आहे. आज दोन्ही पलाख्या वाखरीच्या पालखी तळावर मुक्कामी पोहोचणार आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पंढरपूरला भेट देऊन, जिल्हा प्रशासनानं भाविकांना उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली.
Site Admin | July 4, 2025 9:00 AM | Ashadhi Ekadashi
राज्यात सर्वत्र आषाढी एकादशीचा उत्साह
