July 3, 2025 4:03 PM

printer

आषाढी एकादशी निमित्त दक्षिण मध्य रेल्वे पाच आणि सहा तारखेला विशेष गाड्या चालवणार

पंढरपूर इथं आषाढी एकादशी निमित्त भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे पाच आणि सहा तारखेला विशेष गाड्या चालवणार आहे. यात नगरसोल- मिरज- नगरसोल, अकोला- मिरज- अकोला, अदिलाबाद – पंढरपूर- अदिलाबाद या गाड्यांचा समावेश आहे.