अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित अरीना साबालेंका हिनं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपदावर नाव कोरलं. तिनं अमांडा अनिसिमोव्हा हिच्यावर ६-३, ७-६ अशी थेट सेट्समध्ये मात करून कारकीर्दीतलं चौथं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. तर पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत मार्सेल ग्रॅनोलर्स आणि होरॅशिओ झेबोलास या जोडीनं जो सॅलिसबरी आणि नील स्कूपस्की यांच्यावर ३-६, ७-६, ७-५ असा विजय मिळवला. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत आज रात्री उशिरा यानिक सिनर याचा सामना कार्लोस अल्काराज याच्याविरुद्ध होणार आहे.
Site Admin | September 7, 2025 3:45 PM | arinasabalenka | tenis
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अरीना साबालेंका हिला सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद
