फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अग्रमानांकित अरीना साबालेंका आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेली कोको गॉफ यांच्यात रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामना सुरू होईल.
दरम्यान, पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत काल गतविजेत्या कार्लोस अल्काराजचा प्रतिस्पर्धी लॉरेंझो मुसेटी यानं दुखापतीमुळे सोडला, त्यामुळे अल्काराज अंतिम फेरीत दाखल झाला. तर दुसऱ्या सामन्यात अग्रमानांकित यानिक सिनर यानं नोव्हाक जोकोविचचा थेट सेट्समध्ये पराभव केला.
मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत काल सारा एरानी आणि आंद्रेया वावासोरी या जोडीनं अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंड आणि एव्हान किंग या जोडीवर ६-४, ६-२ असा सहज पराभव करून अजिंक्यपद पटकावलं.