अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

आतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील असं आम आदमी पार्टीने जाहीर केलं आहे. आमदारांच्या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्याआधी अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. 

पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आतिशी मुख्यमंत्रीपदी राहतील हा निर्णय एकमताने घेतल्याचं दिल्ली सरकारमधले मंत्री गोपाल राय यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.