June 7, 2025 2:50 PM

printer

अरविंद चिदंबरम ठरला स्टीपन अवाग्यान स्मृती बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

भारताचा ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरम यानं अर्मेनियात झालेल्या सहाव्या स्टीपन अवाग्यान स्मृती बुद्धिबळ स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. नऊ फेऱ्यांनंतर अरविंद आणि त्याचा प्रतिस्पर्धी ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद हे दोघेही बरोबरीत होते, मात्र टायब्रेकमध्ये अरविंद विजेता ठरला.