पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री म्हणून अरुप बिश्वास यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वीकारला आहे. हे खातं आता ममता बॅनर्जी यांच्याकडे असेल. बिश्वास हे ऊर्जा मंत्री म्हणून मंत्रीमंडळात कायम राहतील. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या उपस्थितीतल्या कार्यक्रमात झालेल्या गैरव्यवस्थापनामुळं क्री़डामंत्री बिस्वास यांनी राजीनामा दिला आहे.
याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारनं पोलिस महासंचालक आणि सॉल्ट लेक स्टेडियमचे मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तसंच बिधाननगरचे पोलिस उपायुक्त अनीश सरकार यांना निलंबित केलं.