डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही राज्ये सांस्कृतिक वारश्यानं समृद्ध असून तिथले नागरिक या अद्वितीय नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारश्याचं अभिमानानं जतन करतील, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. दोन्ही राज्यातले लोक प्रगतीचा आणि उत्कृष्टतेचा नवा अध्याय लिहितील, असंही राष्ट्रपती म्हणाल्या. 

 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अरुणाचल आणि मिझोरम मधल्या नागरिकांना राज्य स्थापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वैविध्यानं नटलेल्या या राज्यांनी भारताच्या वाढीत महत्त्वाचं योगदान दिल्याचं शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.