कृत्रिम फुलांच्या विक्रीमुळे शेतकरी उध्वस्त

सणासुदीच्या दिवसांमध्ये बाजारात कृत्रिम फुलांची विक्री वाढल्यामुळे नैसर्गिक फुलशेती करणारा शेतकरी उध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसंच कृत्रिम फुलांमुळे होणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेता, महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं यावर निर्बंध आणावेत, अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी आणि पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केली आहे. कृत्रिम फुलांना कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली होती. याबाबतच्या शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे.