डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर

राज्याचा २०२५-२६ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आज मंजूर केला. विधानसभेत अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या विभागवार मागण्यांवर सभागृहात चर्चा झाली आणि त्या मंजूर झाल्या. त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरीसाठी महाराष्ट्र विनियोजन विधेयक सादर केलं आणि ते सभागृहानं एकमतानं मंजूर केलं.

 

विधान परिषदेनेही या विधेयकाला मान्यता दिली.महाराष्ट्र मोटार वाहन सुधारणा विधेयक सदस्यांच्या सूचनांसह विधानसभेत पाठवण्यात आलं.‌ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे विधेयक विधानपरिषदेत मांडलं.‌ राज्यात लवकरच पार्किंग धोरण आणलं जाईल, स्कूल बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील, असं त्यांनी सांगितलं.