लष्कर क्रीडा परिषद २०२५ला नवी दिल्लीत आजपासून सुरुवात झाली. २०३६ च्या ऑलिम्पिकमधे यश मिळवण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा धोरणं, संस्थात्मक चौकट आणि तंत्रज्ञानात्मक नवोन्मेष यांच्यात समन्वय साधण्याबाबत या परिषदेतल्या दोन सत्रांमधे चर्चा झाली. ऑलिम्पिकमधे भारताचा रोडमॅप काय असायला हवा हे ठरवण्यासाठी झालेल्या चर्चेत अनेक वरिष्ठ अधिकारी, खेळाडू सहभागी झाले होते.
लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी यावेळी क्रीडा कामगिरी बजावलेल्या तीन खेळाडूंना लष्कर क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं. जागतिक स्तरावरले खेळाडू घडवण्यात भारतीय सैन्याची भूमिका महत्त्वाची असल्याचं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे सचिव हरी रंजन राव यांनी यावेळी म्हटलं.