लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी उत्तराखंडमधल्या गढवाल परिसराला दिली भेट

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज उत्तराखंडमधल्या गढवाल परिसराला भेट देऊन कार्मिक सज्जतेचा आढावा घेतला. सरहद्दीजवळ देशाच्या रक्षणासाठी तैनात सैनिकांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या समर्पित सेवेचं कौतुक केलं. सतर्कता आणि सज्जता उच्च दर्जाची राखण्यावर त्यांनी भर दिला. ज्योतिर्मठ इथं आयबेक्स तराणा या कम्युनिटी रेडिओ वाहिनीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार जनरल द्विवेदी यांनी एका कार्यक्रमात केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.