संरक्षणाखात्यासाठी विविध शस्त्र आणि यंत्रसामुग्री खरेदी करण्याच्या गरजेला संरक्षण अधिग्रहण मंडळाने स्वीकृती दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला. तीनही सेनादलांसाठीच्या मिळून आवश्यक सामग्रीसाठी एकोणऐंशी हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यात लांब पल्ल्याचा प्रक्षेपक पीनाक साठीची स्फोटकं, कमी वजनाची रडार्स, ड्रोन शोधक यंत्रणा. उच्च तरंग लहरींवर चालणारे रेडियो संच, विमानांच्या उड्डाण आणि अवतरणाच्या वेळी लागणारी रेकॉर्डिंग यंत्रणा, अशा अत्याधुनिक उपकरणांचा आणि यंत्रसामुग्रीचा समावेश आहे.
Site Admin | December 29, 2025 8:24 PM
तिन्ही सैन्य दलांसाठी ७९ हजार कोटी रुपयांच्या शस्त्र खरेदीला मान्यता