दिल्ली ते गुजरातपर्यंत पसरलेल्या संपूर्ण अरवली पर्वतरांगेचे अवैध खाणकामापासून संरक्षण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, केंद्राने राज्यांना अरवली पर्वतरांगेत कोणत्याही नवीन खाणपट्ट्या मंजूर करण्यावर संपूर्ण बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने एका निवेदनात पर्वतरांगेची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी ही बंदी संपूर्ण अरवली प्रदेशात समान रीतीने लागू होणार असल्याचं म्हटलं आहे.