प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागालँडमध्ये एकात्मिक अ‍ॅक्वा पार्कची दूरस्थ पद्धतीने पायाभरणी केली.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत नागालँडमधील मोकोकचुंग जिल्ह्यात त्झुडिकोड इथं एकात्मिक मत्स्य उद्यान-ॲक्वा पार्कची पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दूरस्थ पद्धतीनं केली. नागालँडमधील हे पहिले मत्स्य उद्यान ठरणार असून ते मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध विकास उपक्रमांचं केंद्र असेल.
हे एकात्मिक मत्स्य उद्यान मुख्यतः मासे आणि बीज उत्पादनावर केंद्रीत असेल. हे केंद्र नागालँडमधील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला गती देण्यात परिवर्तनकारी भूमिका बजावेल तसंच एक सर्वसमावेशक संसाधन केंद्र म्हणून कार्य करणार आहे. तसंच मत्स्य उत्पादकांना गुणवत्तापूर्ण माहिती, बाजारपेठेतील संपर्क आणि योग्य दरांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उद्यानामुळे नव्या संधी निर्माण होतील, सुशिक्षित बेरोजगार युवकांना सक्षम बनवलं जाईल आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रात शाश्वत विकासाला चालना मिळेल.