डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पुणे शहरातील बहुचर्चित द्रुतगती वर्तुळाकार मार्गासाठी जागा आरक्षित करण्यास मंजुरी

पुणे शहरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी बहुचर्चीत एच सी एम टी आर अर्थात उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गासाठी जागा आरक्षित करण्यास मंजुरी देउन त्याबाबतची अधिसूचना राज्याच्या नगरविकास विभागानं काढली आहे.संपूर्ण उन्नत असणारा सुमारे ३६ किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. या रस्त्याची रुंदी २४ मीटर असेल आणि वाहनांची वेगमर्यादा ५० किलोमीटर प्रति तास निश्चित करण्यात आली आहे. पुणे शहराच्या १९८७ च्या विकास आराखडयात हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. त्यानंतर २० वर्षानी म्हणजे २०१७ मध्ये मंजूर आराखड्यात ३६ किलोमीटर लांबीचा आणि २४ मीटर रुंदीचा हा मार्ग दाखविण्यात आला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.