राज्य पोलीस दलात ८१ पदांच्या नियमित भरतीच्या प्रक्रियेला मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेली पदं ही तांत्रिक आहेत. एकीकडे ही तात्पुरती भरती ११ महिन्यांसाठी करत असतानाच दुसरीकडे ८१ पदांच्या नियमित भरतीच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे, उर्वरित पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरू आहे, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिलं. आमदार रमेश पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. भारतीय तटरक्षक दल, नौदल अशा यंत्रणांमधून सेवानिवृत्त झालेल्यांची भरती कंत्राटी तत्त्वावर करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं. स्थानिक कोळी समाजातल्या पात्र उमेदवारांना  प्राधान्य दिलं जाईल, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.