डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्राची देशात अव्वल कामगिरी

राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्रानं देशात अव्वल कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी  महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं अभिनंदन केलं. केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी राज्यातील कौशल्य विकास उपक्रमांचा आढावा घेतला आणि विभागाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं.  कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला कौशल्य विकास विभागाचे आयुक्त नितीन पाटील, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधुरी सरदेशमुख, रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या  कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांच्यासह  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा