डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 17, 2024 9:35 AM

printer

महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या कामाची प्रधानमंत्र्यांकडून प्रशंसा 

समाजातील प्रत्येक वर्गाच्या सशक्तीकरणाकडं लक्ष केंद्रित केल्याबद्दल महायुती सरकारच्या प्रयत्नांची भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. त्यांनी काल मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. ते म्हणाले की महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील कामांवर महाराष्ट्राची जनता समाधानी आहे. न थकता कित्येक महिन्यांपासून महायुतीचे कार्यकर्ते करत असलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली.