डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर संजय वर्मा यांची नियुक्ती

राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर आज संजय वर्मा यांची नियुक्ती झाली. ते १९९० च्या तुकडीचे भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी आहेत. सध्या ते कायदा आणि तंत्रज्ञान विषयक पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. एप्रिल २०२८ मध्ये ते निवृत्त होणार आहेत. 

 

काँग्रेस आणि इतर पक्षांनी केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं काल रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याचे आणि त्यांची  तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले होते. तसंच विवेक फणसळकर यांच्याकडे या पदाचा तात्पुरता कार्यभार सोपवला होता.

 

Image