अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा आणि त्यासाठी १ लाख अमेरिकी डॉलर्स शुल्क लागू करण्याच्या आपल्या घोषणेचा पुनर्विचार करावा अशी विनंती अमेरिकेतल्या लोकप्रतिनिधीनी केली आहे. माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या अमेरिकेच्या यशामागे भारतीय नागरिकांची मोठी भूमिका असून, या निर्णयामुळे भारत-अमेरिका संबंधांवर नकारात्मक परिणाम होईल असं त्यांनी ट्रम्प यांना लिहिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
अमेरिकेतल्या अनेक आघाडीच्या कंपन्या एच-१बी धारक व्यक्तींनी स्थापन केल्या आहेत अथवा त्यांचं नेतृत्व केलं आहे. तसंच ते नवीन व्यवसाय सुरु करून, रोजगार निर्मिती करतात आणि अमेरिकेला तंत्रज्ञानाच्या प्रगतीत आघाडीवर ठेवतात, असं यात म्हटलं आहे.