वित्तीय सेवा विभागाने तीन महिन्यांच्या कालवधीसाठी राबवलेली “आपकी पूंजी आपका अधिकार” देशव्यापी मोहीम पूर्ण

दावेदाराविना असलेल्या आर्थिक मालमत्तांचा शोध घेण्याच्या दृष्टीने वित्तीय सेवा विभागाने तीन महिन्यांच्या कालवधीसाठी राबवलेली आपकी पूंजी आपका अधिकार ही देशव्यापी मोहीम पूर्ण झाली. या मोहिमेदरम्यान देशातल्या 748 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने सुनियोजित शिबिरे आयोजित करण्यात आली तसेच दावे निकाली काढण्याच्या प्रक्रियेविषयी सार्वजनिक जागरुकता आणि समज वाढल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. वित्तीय प्रणालीचे फायदे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचवणे आणि नागरिकांना सक्षम करणे हा मोहिमेचा उद्देश असल्याचंही मंत्रालयाने म्हटले आहे.