डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 28, 2024 6:43 PM

printer

विद्यार्थ्यांना युवा आपदा मित्र योजनेंतर्गत प्रशिक्षण दिलं जाणार

राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटना, राष्ट्रीय सेवा योजना आणि भारत स्काउट्स आणि गाईड्सच्या दोन लाख ३७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना युवा आपदा मित्र योजनेंतर्गत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या २० व्या स्थापना दिनानिमित्त या योजनेचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला, त्यांनंतर ते बोलत होते. या वर्षी जुलैमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाकडून ४७० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या युवा आपदा मित्र योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती, जी देशातील 315 सर्वाधिक आपत्ती-प्रवण जिल्ह्यांमध्ये लागू केली जाणार आहे.