आयएसएसएफ कनिष्ठ गट जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनुष्का ठोकूर ला सुवर्णपदक

आयएसएसएफ कनिष्ठ गट जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनुष्का ठोकूरने आज मुलींच्या ५० मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. नवी दिल्लीत सुरु असलेल्या या स्पर्धेतलं हे तिचं दुसरं सुवर्णपदक आहे. मुलांच्या स्पर्धेत एड्रियन कर्माकारला रौप्य पदक मिळालं. स्पर्धेत आतापर्यंत ४ सुवर्ण, ६ रौप्य आणि ३ कांस्य पदकं मिळवून भारत पदकतालिकेत अग्रस्थानी आहे.