श्रीलंकेत राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू, अनुरा कुमारा दिसानायके आघाडीवर

श्रीलंकेत राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी कडक बंदोबस्तात सुरू आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार एनपीपी चे उमेदवार अनुरा कुमारा दिसानायके ४४ टक्के मतं मिळवून आघाडीवर आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी साजिथ प्रेमदासा ३० टक्के मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहेत, अशी माहिती श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीलंकेत आज संचारबंदी लागू करण्यात आली होती.