भारताची कुस्तीपटू अंतिम पंघल हिनं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावून भारताचं पदकांचं खातं उघडलं. महिलांच्या ५३ किलो वजनी गटात तिनं स्विडनच्या प्रतिस्पर्ध्याचा ९-१ असा पराभव केला. या स्पर्धेतलं तिचं हे दुसरं पदक आहे आणि ही कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय महिला कुस्तीपटू आहे.
Site Admin | September 19, 2025 1:42 PM | Antim Panghal
जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम पंघलला कांस्यपदक