भारतात पहिलं देशांतर्गत प्रतिजैविक नॅफी-थ्रोमायसिन विकसित

भारताने आपलं पहिलं देशांतर्गत प्रतिजैविक नॅफी-थ्रोमायसिन विकसित केल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत एका वैद्यकीय कार्यशाळेचं उदघाटन करताना बोलत होते. श्वसन संसर्ग, विशेषतः कर्करोगाचे रुग्ण आणि नियंत्रणाबाहेर असलेल्या मधुमेहासाठी हे प्रतिजैविक प्रभावी ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.