November 7, 2024 4:58 PM

printer

सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याचं गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. गृहमंत्री शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. तीन नव्या फौजदारी कायद्यांमुळं नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण होत असल्याचं अमित शहा म्हणाले.

 

कर्तव्य निभावत असताना शहीद झालेल्या ३६ हजारांहून अधिक पोलिसांना शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रीय तपास संस्थेनं या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. केंद्रीय तपास संस्थांचे अधिकारी, न्यावैद्यक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची परिषदेला उपस्थिती आहे.