विद्यापीठ अनुदान आयोगानं देशातल्या ८९ शैक्षणिक संस्थांना नोटीस जारी केली आहे. रॅगिंगला आळा घालण्यात अपयशी ठरल्याबद्दल ही नोटीस जारी केली असून या संस्थांमधे देशातल्या ४ आयआयटी, ३ आयआयएम आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचाही समावेश आहे.
२००९च्या रॅगिंग प्रतिबंधक नियमावलीनुसार विद्यार्थ्यांनी नियमांचं पालन करण्याचं आणि रॅगिंगला आळा घालण्याचं लेखी वचन देणं आवश्यक आहे. ते या संस्थांनी अनुदान आयोगाला सादर केलेलं नाही असं आयोगाचं म्हणणं आहे.