इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने तीव्र झाली आहेत. इराणमधील या अशांत परिस्थितीला दहशतवादीच जवाबदार असल्याचं इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने म्हटलं आहे. इराणमध्ये सध्या इंटरनेट बंद असून तिथल्या सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती मिळणं अवघड होत आहे. तेहरानसह रश्त, तब्रीझ, शिराझ, केरमानमध्ये महागाईच्या विरोधात सुरू झालेल्या या आंदोलनांने राजकीय स्वरूप घेतलं आहे. किमान ५० आंदोलक तर १५ सुरक्षा कर्मचारी यामध्ये ठार झाले असून २ हजार ३ शे जणांना अटक झाल्याचे एचआरएएनएने सांगितलं. २८ डिसेंबरपासून संपूर्ण इराणमध्ये सत्ताधाऱ्याविरोधात निदर्शनं सुरू आहेत.