पोलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या अनू राणीनं सुवर्ण पदक पटकावलं. तिनं यंदाच्या हंगामातल्या सर्वोत्तम अशा ६२ पूर्णांक ५९ शतांश मीटर अंतरावर भाला फेकला. या विजयामुळे अनू राणीला जगातल्या सर्वोत्तम महिला खेळाडुंमध्ये स्थान मिळालं आहे. इतर स्पर्धांमध्ये भारताच्या पूजा हिनं ८०० मीटर महिलांच्या शर्यतीत तिसरं स्थान मिळवलं.
Site Admin | August 7, 2025 1:40 PM | Annu rani | Gold Medal
आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या अनू राणीला सुवर्ण पदक
