डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सह्याद्री वाहिनीवर नव्या तीन कार्यक्रमांची घोषणा

दर्जेदार आणि अभिरुची संपन्न आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रिय असलेल्या दूरदर्शन वाहिनीनं चार नवीन कार्यक्रमांची मेजवानी आणली आहे. यातले तीन कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहेत.

 

या कार्यक्रमांत आमची अनन्या ही कौटुंबिक मालिका, आमचे हे आमची ही हा सेलिब्रिटी जोडप्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आणि वाचू आनंदे हा नामवंत साहित्यिकांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमांविषयी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख संदीप सूद यांनी वार्ताहर परिषदेत सविस्तर माहिती दिली. 

 

 

 

‘आमची अनन्या’ ही मालिका येत्या ९ ऑगस्टपासून शुक्रवार ते रविवार संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होईल.

 

‘आमचे हे आमची ही’ हा कार्यक्रम येत्या १४ ऑगस्टपासून दर बुधवारी संध्याकाळी साडे आठ वाजता प्रसारित होईल.

 

‘वाचू आनंदे हा अभिवाचनाचा कार्यक्रम १२ ऑगस्टपासून दर सोमवार आणि मंगळवारी रात्री साडे आठ वाजते प्रसारित होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.