डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष

विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून अण्णा बनसोडे यांची नियुक्ती झाल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज केली. या पदासाठी बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आणि सर्व सदस्यांनी एकमताने त्याला मंजुरी दिली. बनसोडे हे आमदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.

 

उत्तराखंडमध्ये झालेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, नवी दिल्लीत झालेल्या खोखो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाने मिळवलेले अजिंक्य पदक, आशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला संघाने मिळवलेलं विजेतेपद आणि रणजी क्रिकेट स्पर्धेत विदर्भाने मिळवलेल्या विजयाबद्दल विधानसभेने अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव मांडला आणि सभागृहाने तो एकमताने मंजूर केला. विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव मांडला. सभागृहाने तो एकमताने मंजूर केला.

 

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी सभागृहात केली. त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे सदस्य आक्रमक होऊन गदारोळ झाल्यामुळे कामकाज दहा मिनिटं तहकूब करण्यात आलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी याप्रकरणी तपासात सहकार्य करुन कोणालाही पाठीशी घालणार नाही, असं सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.