राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी गँगस्टर अनमोल बिश्नोई याला आज अमेरिकेतून भारतात परत आणण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर आज दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतराराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. एप्रिल २०२४ मध्ये अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणातही बिश्नोई हा एक आरोपी आहे.