ऑलिम्पिकपटू अंकिता ध्यानी हिनं जेरुसलेम ग्रँडस्लॅम ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या २ हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं. ६ मिनिटं आणि १३ पूर्णांक ९३ शतांश सेकंद वेळ नोंदवून २३ वर्षांच्या अंकितानं याआधीचा पारुल चौधरीचा राष्ट्रीय विक्रमही मोडीत काढला. या यशामुळे पुढल्या महिन्यात टोकियो इथं होणाऱ्या ३००० मीटर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी जागतिक मानांकन कोट्यातून पात्र ठरण्याच्या अंकिताच्या आशा वाढल्या आहेत.
Site Admin | August 16, 2025 3:04 PM | अॅथलेटिक्स | जेरूसलेम | स्टीपलचेस
अडथळ्यांच्या शर्यतीत अंकिता ध्यानीला सुवर्णपदक