November 19, 2024 1:30 PM | anil deshmukh

printer

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक, राजकीय वर्तुळात खळबळ

नागपुरात पारडशिंगा इथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर काल रात्री दगडफेक झाली. या घटनेत देशमुख यांच्या डोक्याला मार लागला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या गाडीवर रात्री दगडफेक झाली. त्यांत डोक्याला मार लागल्याने मस्के यांच्यावर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.