डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 26, 2025 1:29 PM

printer

सुझुकीच्या इलेक्ट्रीक वाहन प्रकल्पाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

भारताच्या मेक इन इंडियाच्या प्रवासात आज एक नवा अध्याय जोडला जात असून मेक फॉर वर्ल्डच्या दिशेनं ही मोठी झेप आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. गुजरातमधल्या हंसलपूर इथं मेड इन इंडिया बॅटरी इलेक्ट्रिक वाहनं – ‘ई वितारा’चं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. ही वाहनं युरोप आणि जपानसारख्या प्रमुख बाजारपेठांसह शंभराहून अधिक देशांमध्ये निर्यात होणार आहेत. भारत आणि जपान संबंधांना यामुळे नवा आयाम मिळेल असं प्रधानमंत्री म्हणाले. 

 

येत्या काळात सर्व क्षेत्रात देशाला प्रगती करायची आहे. आजच्या प्रयत्नामुळे २०४७ चं विकसित भारताचं ध्येय नवी उंची गाठेल, जपान या ध्येयाच्या प्राप्तीत भारताचा विश्वासार्ह मित्र असेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. 

 

गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्र्यांनी इथल्या सुझुकी मोटार प्रकल्पालाही भेट दिली. प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत हंसलपूर इथं हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड्सच्या स्थानिक उत्पादनाचाही प्रारंभ झाला. तोशिबा, सुझुकी आणि डेन्सो यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.