पाकिस्तानच्या कोणत्याही ड्रोनने भारतीय लष्करी किंवा नागरी परिसराचं नुकसान झालं नाही कारण ते सशस्त्र दलांनी आधीच निष्क्रिय केल्याची माहिती संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी दिली आहे. नवी दिल्लीत ते मानवरहित ड्रोन आणि त्यांचा प्रतिरोध करणारी प्रणाली या विषयावरच्या कार्यशाळेला संबोधित करत होते.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने शस्त्रविरहित ड्रोन आणि भरारी पथकांचा वापर केला. ऑपरेशन सिंदूरने स्वदेशी बनावटीची मानवरहित हवाई प्रणाली तैनात करण्याचं महत्त्व अधोरेखित केल्याचंही चौहान यावेळी म्हणाले.