सीबीआयनं आज मुंबईत अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशनच्या कार्यालयावर छापे टाकले. स्टेट बँकेकडून कर्ज घेतलेल्या सुमारे २ हजार ९०० कोटी रुपयांच्या कर्जाप्रकरणी मुंबईत हे छापे पडले. १३ जून रोजी स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशनला दिलेलं कर्ज ‘फसवणूक’ या श्रेणीत वर्ग केलं होतं. कर्जाच्या रकमेचा गैरवापर केल्याचा बँकेचा दावा आहे.
१७ हजार कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीनं अनिल अंबानी यांचं कार्यालय आणि इतर ठिकाणी छापे टाकून काही वस्तू जप्त केल्या होत्या, तसंच त्यांची चौकशी केली होती.