डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्रप्रदेशात विविध विकासकामांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आंध्रप्रदेशातल्या कुरनूल इथं १३ हजार ४३० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. उद्योग, ऊर्जा, रस्ते, रेल्वे, संरक्षण उत्पादन तसंच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूू क्षेत्रातील हे प्रकल्प आहेत.  

 

देशातल्या प्रत्येक गावात वीज पोहोचली असून वीज वापर १४०० युनिटनं वाढल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. ऊर्जा क्षेत्रात भारत नवे मापदंड तयार करत आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी विशाखापट्टणम इथं उभारल्या जाणाऱ्या एआय हबचाही उल्लेख  केला. आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. 

 

त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी श्रीशैलम इथं श्री शिवाजी स्फुर्ती केंद्रम इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ध्यानस्थ मूर्तीला अभिवादन केलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी श्री शिवाजी स्फुर्ती केंद्रममधल्या शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची ओळख करून देणाऱ्या शिल्प, प्रतिमा आणि मूर्तींची पाहणी केली. तसंच मोदी यांनी भ्रमरंबा मल्लिकार्जून स्वामी वरला देवस्थानमला भेट दिली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.