आंध्रप्रदेशातल्या कोन्नासीमा जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत ६ कामगार भाजून मरण पावले तर काही जण जबर जखमी झाले.जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. लक्ष्मी गणपती कारखान्यात ही घटना घडली. फटाक्याच्या दारूने झालेल्या या स्फोटात कारखान्याचं छपरं कोसळलं. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून आवश्यक ती सर्व मदत पोहोचती केल्याचं म्हटलं आहे.
Site Admin | October 8, 2025 7:45 PM | AndhraPradesh | Firecracker Factory
आंध्रप्रदेशातल्या फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत ६ कामगारांचा मृत्यू
