डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सत्यसाईबाबा यांचं जन्मशताब्दी वर्ष जागतिक शांतता, प्रेमाचं महापर्व असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

सत्यसाईबाबा यांचं जीवन वसुधैव कुटुंबकम याचं उदाहरण आहे. त्यामुळे त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष जागतिक शांतता, प्रेमाचं महापर्व असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज काढले. आंध्र प्रदेशातल्या पुट्टपर्थी इथं श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

 

या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सत्य साई बाबा यांच्या सन्मानार्थ काढलेल्या विशेष नाण्याचं आणि टपाल तिकीटाचं प्रकाशन झालं. सत्यसाईबाबांनी अध्यात्माला जनसेवेशी जोडले. मानव सेवा ही माधव सेवा आहे अशी त्यांची धारणा होती आणि आजही त्याच धारणेनं त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून कार्य सुरू असल्याचं गौरवोद्गार प्रधानमंत्र्यांनी काढले.  

 

प्रधानमंत्री मोदी यांचं आज सकाळी आंध्र प्रदेशातल्या पुट्टपर्थी विमानतळावर आगमन झालं. त्यावेळी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री के. पवन यांनी त्यांचं त्यानंतर प्रधानमंत्री प्रशांती निलयम इथल्या श्री सत्य साईबाबा यांच्या समाधीस्थळी पूजा केली. त्यानंतर तिथं काही काळ ध्यानधारणा केली. त्यानंतर गोदानम् कार्यक्रमाअंतर्गंत चार शेतकऱ्यांना त्यांनी गो-दान केलं. या कार्यक्रमाला प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

त्यानंतर प्रधानमंत्री तामिळनाडूच्या कोईम्बतूर इथं होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते पीएम-किसान योजनेच्या २१व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार असून या अंतर्गंत नऊ कोटी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. आतापर्यंत पीएम- किसान योजनेअंर्तंग ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना  ३ लाख ७० हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे.