आंध्रप्रदेशातल्या रामपाचोदावरम इथं आज सकाळी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत सहा ते सात नक्षली मारले गेले. यात काही वरिष्ठ नक्षली नेत्यांचा समावेश असल्याचं गुप्तचर विभागाचे अतिरिक्त महासंचालक महेश चंद्र लड्डा यांनी वार्ताहरांना सांगितलं.
एनटीआर, कृष्णा, काकिनाडा, एलुरू या जिल्ह्यांमधून जवळपास ५० नक्षलींना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि शस्त्रं जप्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, आंध्रप्रदेशात छत्तीसगड सीमेवर काल झालेल्या चकमकीत वरिष्ठ नक्षली नेता हिडमा मडावी मारला गेला.