November 1, 2025 8:02 PM | Andhra Pradesh

printer

आंध्रप्रदेशच्या श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीत ९ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातल्या श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात आज चेंगराचेंगरी होऊन किमान ९ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेतल्या मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमींना लवकर बरं वाटावं, अशी प्रार्थना केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबांना २ लाख रुपये नुकसानभरपाई, तर जखमींना ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यायची घोषणा केली. आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर, मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.