कांदळवनाच्या परिसरात बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि संबंधित जागेवरचे भराव हटवून मूळ कांदळवनाची पुनर्स्थापना करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. त्या आज अंधेरी इथल्या लोखंडवाला बॅक रोड परिसरात कांदळवनाच्या कत्तलीप्रकरणी पाहणी केल्यानंतर बोलत होत्या. कांदळवनाची कत्तल करून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू असल्याच्या सर्व प्रकरणांचं संकलन करून तात्काळ कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. हे प्रकार थांबायला हवेत, पर्यावरणाच्या रक्षणासाठी यंत्रणांनी जलद गतीने काम केलं पाहिजे असं मुंडे यांनी सांगितलं.
Site Admin | July 19, 2025 6:12 PM
कांदळवनाची पुनर्स्थापना करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे आदेश
