भारत आणि इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आज लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु होत आहे. मालिकेतला चौथा सामना अनिर्णित राहिल्यामुळं सध्या इंग्लडकडे २-१ अशी आघाडी आहे.
अंतिम सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी भारताला आहे. गेल्या चार सामन्यात एकदाही नाणेफेकीचा कौल भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या बाजूनं लागला नाही. या सामन्यात यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेतीन वाजता सुरु होईल.