अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिका बरोबरीत सुटल्यामुळे भारत जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत इंग्लंडबरोबर साधलेल्या गुणांच्या बरोबरीमुळे भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ओव्हल इथे झालेल्या या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. काल झालेल्या या मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारतानं इंग्लंडवर विजय मिळवत २-२ अशी बरोबरी साधली. ५ गडी बाद करणारा मोहम्मद सिराज हा सामनावीर ठरला. शुभमन गिल आणि हॅरी ब्रुक हे दोघं मालिकावीर ठरले. या विजयामुळे भारताच्या खात्यात १२ गुणांची भर पडली असून भारतीय संघ आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या गुणतालिकेत आघाडीवर आहे.