डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत चौथा सामना अनिर्णित

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत मँचेस्टर इथला चौथा सामना अनिर्णित राहीला. अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना अनिर्णित राखण्यात काल भारतीय संघाला यश मिळालं.  कर्णधार शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची झुंजार शतकं तर के एल राहुलच्या ९० धावा ही डावाची वैशिष्ट्यं ठरली. वॉशिंग्टन सुंदरचं हे कारकिर्दीतलं पहिलं शतक होतं. यजमान संघाच्या ३११ धावांच्या आघाडीला प्रत्युत्तर देताना सामना अनिर्णित ठेवत दुसऱ्या डावात भारताने ४ बाद ४२५ धावा केल्या. यामध्ये जडेजा आणि सुंदर यांची 203 धावांची संयमी भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. कर्णधारपदाची धुरा सांभाळताना  पहिल्याच कसोटी मालिकेत चार शतकं झळकावणारा पहिला कर्णधार-फलंदाज हा विक्रम शुभमन गिलने नोंदवला आहे. 

 

पाचवा सामना  ओव्हल मैदानावर येत्या गुरुवारी सुरु होईल. कर्णधार शुभमन गिल च्या नेतृत्वात भारतीय संघ असा आहे. यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कांबोज, अर्शदीप सिंह, या  सामन्यासाठी यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे. मँचेस्टरला झालेल्या चौथ्या सामन्यात त्याच्या उजव्या पायाचं हाड मोडल्यामुळे त्याला पाचवा सामना खेळता येणार नाही. त्याच्या ऐवजी तमिळनाडूचा एन जगदीशन याचा समावेश केल्याचं क्रिकेट नियामक मंडळानं काल रात्री जाहीर केलं. मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना क्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर खेळताना चेंडूने जखमी झाल्यानंतर पंत ने दुसऱ्या दिवशी झुंजार खेळी केली होती. 

 

पाच सामन्यांच्या या मालिकेतले दोन सामने इंग्लंडने जिंकले असून एक भारताने जिंकला आहे. पाचवा सामना जिंकून बरोबरी साधण्याची संधी भारताला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा