अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारत पराभवाच्या छायेत आहे. लॉर्ड्स मैदानावर सुरु असलेल्या या सामन्याच्या पहिल्या डावात दोन्ही संघांनी प्रत्येकी ३८७ धावा केल्या होत्या. इंग्लडचा दुसरा डाव १९२ धावांवर गुंडाळण्यात आज भारताला यश आलं. मात्र या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पूर्णपणे गडगडली. यशस्वी जैस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदर एकही धाव न करता तंबूत परतले.
शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या ९ बाद १४९ धावा झाल्या होत्या.